महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदअंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष उन्नती महिला प्रभाग संघ पाथर्डी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा डेंग्याचीमेट येथे आयोजित करण्यात आली. विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा संपन्न झाली. यावेळी त्यांनी महिलांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत, महिलांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले.