संगमनेर तालुक्यातील कनोली ग्रामसभेत खळबळ – सरपंच भाऊसाहेब पवार यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, भरसभेत जाहीर माफी संगमनेर तालुक्यातील कनोली गावात झालेल्या ग्रामसभेत मोठा राजकीय वादंग उफाळून आला. सरपंच भाऊसाहेब पवार यांच्यावर दलित वस्ती निधी, रस्त्याच्या मुरुमीकरणाचा निधी, घरकुल वाळू परवानगीतील गैरव्यवहार आणि घरकुलधारकांकडून ११ हजार रुपये वसूल केल्याचे गंभीर आरोप ग्रामस्थांनी सभेत उपस्थित केले.