महसूल सेवक म्हणजेच कोतवाल हा महसूल विभागाचा महत्त्वाचा कणा आहे. विविध योजना व शासकीय धोरणे शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम कोतवाल करीत असतो तसेच कोतवाल हा जनतेच्या दैनंदिन गरजाशी निगडित असा घटक आहे. गेल्या अनेक वर्षापासून कोतवाल यांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याचे मागणे करण्यात आली आहे परंतु अजून सुद्धा ही मागणी पूर्ण झाली नसल्याने आज दिनांक 12 सप्टेंबर सकाळी दहा वाजता पासून नांदुरा तहसील समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.