ढोमणे गावात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारूविक्रीविरोधात वंचित बहुजन आघाडीने तीव्र आंदोलन पुकारले आहे. या दारूविक्रीमुळे गावातील तरुण व्यसनाधीन होत असून, अनेक कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.