बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे, मराठा आरक्षण विषयावर इशारा बैठक आज रविवार दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता घेण्यात आली.या बैठकीत मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील उपस्थित होते. तसेच खासदार बजरंग सोनवणे यांनीही सहभाग नोंदवला.मुंबई येथील आझाद मैदानात होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. बैठकीत मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच आंदोलन अधिक प्रभावी करण्यासाठी विविध सूचना व मार्गदर्शनही करण्यात आले.