नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात रोख रक्कम असलेली बँग अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नालासोपारा आरपीएफ आणि सीपीडीएसच्या पथकाने सीसीटीव्ही आणि एफआरएसच्या मदतीने एका संशयिताला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी आरोपी गयासुद्दीन अब्दुल सत्तार शेख याला अटक करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी वसई लोहमार्ग पोलीसांच्या हवाले करण्यात आले.