नंदुरबार शहरातील सिद्धिविनायक चौक परिसरात बॅनर लावण्याच्या वादातून मोहित राजपूत यांचा मारहाणीत मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु अद्याप मारेकरी पकडले गेले नाही. मारेकरी लवकरात लवकर पकडण्यात यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आज कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आले आहे.