उदगीर शहरातील फुले नगर भागात उदगीर शहर पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून १४ लोकांवर उदगीर शहर पोलीस ठाण्यात ३० ऑगस्ट रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, फुले नगर भागात तीरट नावाचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ३० ऑगस्ट रोजी रात्री सव्वा एक वाजता पोलिसांनी छापा टाकला असता आरोपींने बेकायदेशीररित्या स्वतः च्या फायद्यासाठी जुगार खेळत व खेळवीत असताना ४० हजार ६१० रुपयांच्या मुद्देमालासह आढळून आला