हिंगोली नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा शिवारात आज दि.9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5-45 वा सुमारास नांदेड आगाराची हदगाव नांदेड बस क्र. एम एच13 सीयू 6988 ही बस डोंगरकडा शिवारात आली असताना विरुद्ध बाजूला येणाऱ्या दुचाकीला धडक घेऊन पुढे विद्युत जनित्र असलेल्या खांबाला जोराची धार दिली,दुचाकी वरील एक जण जखमी झाला असता त्यास प्रा.आ .केंद्र डोंगरकडा या ठिकाणी हलवण्यात येऊन तपासणी अंती त्यास मृत घोषित केले आहे .आ. बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेची माहिती घेतली