भुम (दि. 12 सप्टेंबर) : भुम तालुक्यातील हाडोंग्री शिवारातील जिओ टॉवरवरून अज्ञात चोरट्यांनी दोन बॅटऱ्या लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. 3 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता जिओ टॉवर (क्र. MH BH OM ENB 9043) येथे बॅकअपसाठी बसविण्यात आलेल्या व्हिजन कंपनीच्या दोन 100 एएच क्षमतेच्या बॅटऱ्या, किंमत अंदाजे १० हजार रुपये, अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्या. या प्रकरणी वैभव अरुण सुरवसे (वय 26, रा. सावरगाव, ता. भुम) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुम पोलीस ठाण्यात गुन्हा दा