सावळी येथे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' कार्यशाळा, संपन्न. ग्रामीण विकासाची नवी दिशा ठरवणारे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा दहा सप्टेंबर रोजी चिखली मतदारसंघातील सावळी (ता. बुलढाणा) येथे संपन्न झाली. आपल्या ग्रामपंचायती सक्षम करणार्या या अभियानाविषयी या वेळी आमदार श्वेता महाले यांनी सविस्तर माहिती दिली.