लाडक्या गणरायाला शनिवारी निरोप दिल्या जाणार आहे. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि कौटुंबिक स्तरावर मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. गणेश विसर्जन वेळी एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये या दृष्टिकोनातून यवतमाळ नगर पालिकेने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विसर्जनाची जय्यत तयारी केली असून शहरातील ३१ ठिकाणी कृत्रिम टाके तयार केले आहेत. तर परंपरागत विसर्जन ठिकाणी असलेल्या विहिरी आणि टाक्यांचीही स्वच्छता करण्यात आली आहे.