मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिल्याने वातावरण तापले असताना, लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत आंदोलनाला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर, आरपीआयचे (खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी सोमवारी सकाळी १०.२४ वाजता आवाहन केले की, स्वयंघोषित ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करून राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवू नये.