विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी कंपनीच्या प्रकल्पग्रस्त #कामगारांनी थकीत वेतन व रोजगाराच्या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन अखेर यशस्वी झाले आहे. त्यांच्या वेदना, आक्रोश आणि न्याय्य मागण्यांची जाणीव ठेवून मी स्वतः आंदोलनस्थळी धाव घेतली आणि तब्बल चार तास ठिय्या मांडत कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधला. या चर्चेतून १०३ प्रकल्पग्रस्तांना १० सप्टेंबरपासून सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीवर कामावर घेण्याचा निर्णय झाला आहे.