सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सुचनेनुसार मंगळवारी सकाळी ११ वाजता केसरकर पेठेत पाण्याच्या टाकीच्या खाली असलेल्या मटक्याच्या टपरीवर कारवाई करुन ती टपरीच हटवण्यात आली. ही कारवाई अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने केली. गेल्या कित्येक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.