सिरोंचा तालुक्यातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मान. डॉ. अशोकजी नेते यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नागपूर–सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा रामगुंडमऐवजी मंचेरियाल येथे देण्यास मान्यता मिळाली आहे.