अमळनेर तालुक्यातील आर्डी गावातील एका भागात राहणाऱ्या एकाच घरातील दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याची घटना मंगळवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता समोर आली आहे. या संदर्भात बुधवारी १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.