पवनार येथील शेतकरी अनुप चंदनखेडे यांच्या शेतातील सोयाबीनचे पिक अक्षरशः काळवटून गेले आहे. शेतकऱ्यांचे हे अतोनात झालेले नुकसान पाहून अखेर प्रशासनाला जाग आली आहे. आज 25 सप्टेंबर रोजी विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी या नुकसानीची स्वतः दखल घेत, प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे नुकसानग्रस्त गावातील शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी हजेरी लावून जमले होते. असे रात्री 8 वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे