लग्नाचे आमिष दाखवून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत २३ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या सराफा व्यावसायिक व त्याच्या साथीदाराची २१ ऑगस्टला कारागृहात रवानगी झाली.सुनील बोके (४८, रा. गांधीवार्ड, देसाईगंज), अक्षय कुंदनवार (३२, रा. मधुबन कॉलनी, देसाईगंज) यांना २३ वर्षीय तरुणीच्या फिर्यादीनुसार लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात यांच्यावर कारवाई झाली आहे.