आज दिनांक सात सप्टेंबर ला सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये नेहरू महाविद्यालय नेर येथे नेर तालुक्यातील उमेदवारांची आपले सरकार सेवा केंद्रासाठी लेखी परीक्षा पार पडली. यावेळी केंद्रावर 260 परीक्षार्थी होते.ही परीक्षा एकूण वीस गुणांची होती.यावेळी परीक्षा केंद्रावर पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता. तसेच नेर तहसीलचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून परीक्षा केंद्राचे निरीक्षण केले.याशिवाय प्रा. डॉ.महेश गोमासे,अमोल अगम सह अनेक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.