रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आयोजित "सोनी पैठणी महोत्सव" प्रदर्शनाचे उद्घाटन पनवेल येथे आज शुक्रवारी १० च्या सुमारास आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपल्या महाराष्ट्राच्या स्थानिक कला आणि परंपरेला प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांचे महत्व अधोरेखित करणारा हा उपक्रम स्तुत्य आहे. या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, मोहिनी विक्रांत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, ॲड. प्रथमेश सोमण तसेच रोटरी क्लब पनवेल सेंट्रलचे मार्गदर्शक डॉ.गिरीश गुणे उपस्थित होते.