दिनांक 24 ऑगस्ट रोजी स्थानी गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यावर कारवाई करणे कामे पेट्रोलिंग करीत असताना कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील रिव्हर्स टोन फॉर्म तेलगाव येथे विनापरवाना हुक्का व तंबाखू जन्यपदार्थ व साहित्य लोकांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे पंचायत समक्ष छापा टाकला असता तेथे स्वरूप किशोर मुंडे हर्ष विजय कंगाले आदित्य माणिक इंगळे यांच्याकडून पंधरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला