पंढरपूर शहरात जागोजागी चेंबर नादुरुस्त होऊन अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे भीक मांगो आंदोलन करून नगरपरिषदेला दुरुस्तीसाठी पैसे देऊ का? असा सवाल समाजसेवक अरुण कोळी यांनी उपस्थित केला आहे. आज रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथे पत्रकरांशी बोलत होते. दरम्यान, या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.