जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असलेल्या उत्सवाला भेट देऊन, दुर्गा मातेचे दर्शन घेतले. त्यांनी कोहमारा येथील काली माता मंदिर आणि नवेगाव बांध येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाला आवर्जून भेट देऊन मातेच्या चरणी नतमस्तक झाले.