सरकारी नोकरीचे आमिष दाखवूनठगबाज टोळीने थेट मंत्रालयात मुलाखत घेऊन अनेक तरुणांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी लॉरेन्स हेनरीला अटक करण्यात आली आहे. या टोळीने 15 ते 16 विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे आणि यामध्ये फसवणूक झालेल्या पिडीतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फरार आरोपींमध्ये शिल्पा हेनरी, विजय पाटणकर नितीन साठे यांचा समावेश आहे. आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.