भारतीय जनता पक्षाच्या वतीने नालासोपारा पूर्वेकडील मलकापूर येथील एकविरा हॉल येथे जिल्हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सेवा पंधरवड्यात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत त्याचप्रमाणे पक्षबांधणी संघटना बांधणी आदींसह विविध विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे प्रदेश संघटन महामंत्री हेमंत म्हात्रे, नालासोपाराचे आमदार राजन नाईक, वसई विरार जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.