आज ५ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विसर्जनासाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेकडून एकूण ३५ ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत अशी माहिती मिरा भाईंदर महापालिकेने आज दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० च्या सुमारास एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. गणेशभक्तांनी या कृत्रिम तलावात आज श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करून मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करून पर्यावरणाचा ऱ्हास टाळावा असे आवाहन महापालिकेने केलं आहे.