राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालय गोंदिया येथील विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथे गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांची भेट घेतली.त्यात येणाऱ्या आपत्तीचे कसे निराकरण किंवा व्यवस्थापन करण्यात येईल यावर जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राध्यापक संगीता घोष,प्राध्यापक आनंद पटले,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे,प्रमुख मार्गदर्शक म्हणून जयंत शुक्ला आदी उपस्थित होते.