जिल्हा सांख्यिकी कार्यालयाची निर्मिती असलेल्या जिल्ह्याचे शाश्वत विकास ध्येये, जिल्हा निर्देशक आराखडा प्रगतीमापन अहवाल सन २०१५-१६ ते सन २०२२-२३ पुस्तिकेचे प्रकाशन आज सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक वृषाली माकर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.