आमदार मिलिंद नरोटे यांच्याकडून धानोरा येथे गटशिक्षणाधिकारी गट साधना केंद्र तसेच जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग या दोन्ही शासकीय कार्यालयांना भेट देऊन पाहणी करण्यात आली. गट साधना केंद्रात पाहणीदरम्यान नियोजनातील कमतरता, कर्मचाऱ्यांमधील ताळमेळाचा अभाव, स्वच्छतेकडे दुर्लक्ष तसेच साठवणूक खोली आणि स्वच्छतागृहाच्या अपुऱ्या देखभालीसारख्या त्रुटी लक्षात आल्या.