उमरखेड तालुक्यातील बाळदी या गावाच्या वरच्या बाजूस असलेल्या माळाचे पुराचे पाणी नाल्याच्या माध्यमातून दरवर्षी गावालगतच्या पांदण रस्त्यांमधून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे पांदण रस्त्याच्या शेजारी नागरिकांच्या घरात दरवर्षी पाणी जात असल्यामुळे जवळपास 50 पेक्षा जास्त नागरिकांच्या घरात पाणी जाते. ही समस्या दरवर्षी निर्माण होत असल्यामुळे याकडे लक्ष देऊन समस्या निकाली काढण्याची मागणी करण्यात आली आहे.