रायगड जिल्ह्यातील तळा व म्हसळा तालुक्यातील गावांना आदिवासी घरकुल योजनेचा लाभ मिळण्याबाबत महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास बैठक संपन्न झाली. यावेळी तळा व म्हसळा तालुक्यातील सर्व पात्र आदिवासी लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. चर्चेअंती संबंधित अधिकाऱ्यांना उचित कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.