राधानगरी तालुक्यातील राधानगरी येथे तहसीलदार कार्यालय,पोलीस ठाणे,व गटविकास अधिकारी येथे प्रशासकीय कामात समाजातील तज्ञ, समाजसेवक, विविध घटकातील प्रतिनीधी इ. चा समावेश करण्यात येतो. असा समावेश करून विविध समित्या स्थापन करून सदस्यांची निवड करण्यात यावी. या माध्यमातून तालुकास्तरीय पुढील समित्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या समित्यातून तालुकास्तरीय स्तराचे बहुतांशी प्रश्न सोडविण्यात मदत होईल, असे मनसे जनाधिकार सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज येडूरे यांनी समिती स्थापन करण्यासाठी निवेदन दिले आहे.