अक्कलळकोट तालुक्यातील हंनूर येथे नातवासाठी आजीनं आपले प्राण सोडल्याची धक्कादायक आणि अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. हन्नूर गावात कुटुंबावर काळाने घाला घातला, अपघातात एकुलत्या एक नातवाचा मृत्यू झाला, नातवाचा मृत्यू झाल्याने आजीला मोठा धक्का बसला. हा धक्का पचवू शकली नाही. नातवाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असताना ती धायमोकलून रडली आणि अखेर तिनेही स्मशानभूमीतच आपले प्राण सोडले. आजी नातवातलं हे नातं आणि या घटनेमुळे गावात शोककळा पसरली, संपूर्ण गाव हळहळलं.