काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पाण्याचा विसर्ग येत्या काही तासांत पावसानुसार वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहून, नदीपात्र ओलांडण्याचा धोका पत्करू नये, असे आवाहन प्रशासनाने दि. 3 सप्टेंबर रोजी केले आहे. पूर नियंत्रण कक्षाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, स्थानिक प्रशासनानेही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.