वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षते पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. लोकाभिमुख सक्षम पंचायतराज उभारणे, पंचायतींचे आर्थिक सक्षमीकरण करणे, मनरेगा व ग्रामविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत असून यामुळे ग्रामविकासाची गती वाढणार असल्याचा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.