मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जारंगे पाटील यांनी आज शुक्रवार, दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. राज्यभरातून मराठा समाजबांधव या आंदोलनात सहभागी होत असताना माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी देखील आंदोलनस्थळी उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शविला. काल गुरुवारीच मुंबईकडे रवाना झालेल्या अभिजीत पाटील यांनी आज दुपारी दोनच्या सुमारास आझाद मैदानावर पोहोचून मनोज जारंगे पाटील यांची भेट घेतली आणि आंदोलनाबाबत चर्चा केली.