भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी रविवारी सकाळी १० वाजता संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, संजय राऊत यांच्या मेंदूला लकवा मारला असेल. देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर महाराष्ट्राने विश्वास दाखवला आणि त्यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री केलं. राऊत यांनी शेण खावं, पण फडणवीसांवर टीका केली तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. राऊत यांचे कारनामे महाराष्ट्राला सांगितल्यास ते अलिबागच्या बंगल्यात तोंड काळं करतील, असा इशाराही बन यांनी दिला.