पाच दिवस गणरायाची मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. वाजत गाजत गणरायाची विसर्जन मिळवणूक काढून पालघर जिल्ह्यात पालघर बोईसर डहाणू वसई विरार नालासोपारा या ठिकाणी कुंड, तलाव, समुद्र, नदी या ठिकाणी विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या असा जयघोष करत गणपती बाप्पांचे विसर्जन करून गणपती बाप्पांना भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला.