पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हत्यार बंदीचे आदेशाचे उल्लंघन करून लोखंडी कोयत्यासह एकास अटक करण्यात आली आहे. प्रशांत गणेश शिवशरण वय 29 वर्ष रा. भुजबळ, चाकण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई संदीप गंगावणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.