धाराशिव जिल्ह्यात ईपीक पाहणी विविध योजनेसाठी बंधनकारक करण्यात आली आहे. परंतु ई पीक पाहणी ॲप मात्र कुचकामी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे ही समस्या मार्गी लावावी अशी मागणी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ८ सप्टेंबर रोजी दोन वाजता करण्यात आली.