वर्ध्यातून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पुणे येथून मोठ्या शिताफीने अटक केली पोलिसांनी आज, २५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती कळवण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा हा गंभीर गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU), वर्धा आणि स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांच्या संयुक्त पथकाने उघडकीस आणला आहे.