धुळे येथे महात्मा फुले समता परिषद व समविचारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून मराठा समाजाला 'सगेसोयरे' तरतुदीनुसार कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत, ओबीसी कोट्यात समावेश करणे अन्यायकारक व असंवैधानिक असल्याचा आरोप संघटनांनी केला. निवेदन देऊन शासन निर्णयाचा निषेध नोंदवला.