दिनांक ९ सप्टेंबर पासून ठाणे महापालिका मुंब्रा येथील विविध अनधिकृत इमारतींवर कारवाई करणार आहे. त्यासाठी महापालिकेने नोटीस देखील बजावली आहे. मात्र ठाणे मनपाच्या कारवाईला स्थानिक पत्रकार रफिक कामदार यांनी विरोध केला आहे. आज दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या त्यांनी मुंब्रा येथे पत्रकार परिषदेतून आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी ठाणे मनपावर आरोप देखील केले आहेत.