आठ सप्टेंबरला रात्री साडेबारा वाजता च्या सुमारास अजय यादव वय 25 वर्ष राहणार धरमपेठ हा त्याच्या वस्तीतील ओम बाल गणेश उत्सव मंडळाचा गणपती रणगाडा ट्रॅक्टरने विसर्जनाकरिता कोराडी तलाव येथे जात असताना पल्सर दुचाकीने कार्यकर्त्यांसोबत जात होता. दरम्यान पोलीस ठाणे कोराडी हद्दीतील रेडमीया हॉस्पिटल समोरील उड्डाणपुलावर ट्रेलर ला ओव्हरटेक करीत असताना ट्रेलर चालक राजेश चौधरी याने त्याच्या ताब्यातील ट्रेलर धोकादायक पद्धतीने चालवून दुचाकीला कट मारल्याने अजय खाली पडला.