काटोल नरखेड परिसरासह संपूर्ण विदर्भात झालेल्या सततच्या अवकाळी व मुसळधार पावसामुळे या भागातील प्रमुख फळपिके असलेले संत्रा व मोसंबी या बागायती पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ होऊन शेतकरी बांधवांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. दिवाळीपूर्वीच तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार चरणसिंग ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली