बुलढाणा शहरातील शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे 12 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता मोताळा तालुक्यातील गुगळी येथील ग्रामपंचायत सदस्य विजय आसने तसेच कोल्ही गोल्हर येथील उपसरपंच सर्वेश्वर पाटील यांना बुलढाणा विधानसभा आरोग्यदूत पदी नियुक्ती दिली.यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली.या प्रसंगी महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारिणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड आदी उपस्थित होते.