एक 57 वर्षीय इसम नेहमीप्रमाणे शेताकडे फिरायला जातो असे सांगून घरून निघून गेला. सायंकाळच्या सुमारास घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याच्या शोध घेतला मात्र त्या दिवशी संबंधित इसम आढळून आला नाही. पुढील दिवशी सकाळी 11 वाजताच्या सुमारास शेतशिवारात संबंधिताचा मृतदेह आढळून आला. राजकुमार वासुदेव तिरपुडे (57) रा मासलमेटा असे घटनेतील मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. संबंधित इसमाचा पाटाच्या पाण्यात पाय घसरून तोल जाऊन बुडून मृत्यू झाल्याच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.