कीटकनाशकाचे प्राशन केलेल्या मंद्रूप येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बनसिद्ध मलकारी कुमठाळे (वय ५४, रा. मंद्रूप, दक्षिण सोलापूर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते शुक्रवारी मध्यरात्री राहत्या घरी अज्ञात कारणावरून तुरीवर कीटकनाशक औषध पिल्याचे प्रकार घडले. ही घटना नातेवाइकांना शनिवारी पहाटे निदर्शनास आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू त्यांचा उपचारादरम्यान शनिवारी सायंकाळी 7 वाजता मृत्यू झाला.