गडचिरोली येथील नगर परिषद शाळेत तसेच बऱ्याच जिल्हा परिषद शाळेत भाजपाचे आमदार मिलिंद नरोटे यांनी पक्षाच्या नाव, चिन्हासह आपल्या विविध राजकीय कार्यक्रमाचे छायाचित्र असलेले वह्यांचे वाटप करून शाळेच्या अराजकीयतेवर गदा आणून शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली केल्याचा आरोप “आजाद समाज पार्टीने” केला आहे.शाळांना भेट दिली असता काही दिवसापूर्वी कॉंग्रेस नेते विश्वजित कोवासे यांनी सुद्धा शाळेत असे साहित्य दिले असल्याची घटना पाहायला मिळाली.